Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (2024)

Maharashtra Breaking News Update : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघातानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील, पबमधील कर्मचारी यांना अटक केली. तसेच अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेबरोबरच महाराष्ट्रात गुरुवारी उजणी जलाशय आणि प्रवरा नदीत बोट बुडण्याच्या दोन घटना घडल्या. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला. तसेच काल डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलर स्फोट दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ५० पेक्षा जास्तजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डोंबिवली एमआयडीसी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. डोंबिवली एमआयडीसी केमिकल दुर्घटनेनंतर केमिकलच्या वाफेमुळे हवेत दुर्गंधी पसरली आहे. याबरोबरच देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या असून उद्या दिल्ली उत्तर प्रदेश, बिहारसह ५७ जागेंसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. तसेच सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे.यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

नक्की वाचा
Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (1)

Pune Porsche Accident : चालकाचा महत्त्वाचा जबाब; म्हणाला, “अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी मला…”

Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (2)

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (3)

Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..

Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (4)

‘दोन एफआयआर का, गाडीत किती लोक होते, आरोपीला पिझ्झा दिला का?’; पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती

Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (5)

भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण

Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (6)

Pune Porsche Accident : “ऑनलाईन बिलांवरून स्पष्ट झालंय की…”, ‘त्या’ व्हायरल VIDEO बाबत पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टकरण

Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (7)

Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”

Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (8)

Maharashtra News : “बिल्डरच्या माजोरड्या मुलामुळे दोघांचा बळी गेला”, पुण्यातील अपघातावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

Live Updates

Marathi News Updates 24 May 2024

21:03 (IST) 24 May 2024

मुंबई : नागपाड्यात नायजेरियन तस्कराला पकडले, ८० लाखाचे कोकेन जप्त

मुंबई : अमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) नागपाडा येथे एका ५५ वर्षीय नायजेरियन तस्कराला पकडले. त्याच्याकडे २०० ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्याची किंमत ८० लाख रुपये इतकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा सविस्तर...

19:41 (IST) 24 May 2024

मुंबई : मतदान केंद्रातील चित्रीकरण समाज माध्यमांवर टाकणाऱ्याविरोधात गुन्हा

मुंबई : मतदान केंद्रात मतदान करताना केलेल्या चित्रिकरणप्रकरणी संबंधिताविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मतदान यंत्रावरील महिला उमेदवाराच्या छायाचित्राकडे अश्लील हातवारे करताना केलेले चित्रीकरण व्हॉट्सॲप ग्रुपवर अपलोड केल्याचा आरोप आहे.

वाचा सविस्तर...

18:09 (IST) 24 May 2024

मोठ्या आवाजात भांडणाऱ्याकडे पाहिल्याने कामोठ्यात डॉक्टराला मारहाण

एक तरुण रात्रीच्या साडेबारा वाजता दोन मुलींसोबत भांडत होता. तो तरुण मोठ्या आवाजात का भांडतोय, हे तिथे रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या एका ६९ वर्षीय डॉक्टरांनी पाहीले. एवढेच निमित्त झाल्याने या २० वर्षीय तरुणाने लाथाबुक्यांनी मारहाण केली. सविस्तर वाचा…

17:27 (IST) 24 May 2024

Dombivli MIDC Blast: बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांची पालिका रुग्णालय, कंपनी परिसरात शोधाशोध

अमुदान कंपनीतील आग, तेथील धूर आणि रसायनांच्या स्फोटामुळे वाढलेले तापमान नियंत्रित करण्यात अग्निशमन, आपत्कालीन विभागाच्या पथकांना शुक्रवारी यश आले. सविस्तर वाचा…

17:12 (IST) 24 May 2024

पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडिलांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुण्यात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर या प्रकरणातील आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर आता अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

16:32 (IST) 24 May 2024

गुजरातमधील अपघातात नाशिकच्या तीन मजुरांचा मृत्यू

मालमोटर अपघातात नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण जखमी आहेत.

सविस्तर वाचा...

16:26 (IST) 24 May 2024

नाशिक: लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात

निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सविस्तर वाचा...

16:22 (IST) 24 May 2024

बिभव कुमार यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील मारहणीच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बिभव कुमार यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. बिभव कुमार हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक आहेत.

16:08 (IST) 24 May 2024

कल्याण डोंबिवली पालिकेची बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई; लोखंडी सांगाडे कटरच्या साहाय्याने भुईसपाट

कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता पालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्जचे लोखंडी सांगाडे तोडण्याची जोरदार मोहीम प्रभाग स्तरावर साहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून सुरू करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

15:39 (IST) 24 May 2024

डोंबिवली स्फोट प्रकरणी मालती मेहता यांना पोलिसांकडून अटक

डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलर स्फोट दुर्घटना घडली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. तसेच ५० पेक्षा जास्तजण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर आता या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल झाला असून या प्रकऱणी पोलिसांनी मालती मेहता यांना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

15:05 (IST) 24 May 2024

आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा: म्हणाले, ‘पबचालकांकडून हप्ते घेणाऱ्या ‘त्या’ तीन पोलिसांची चित्रफीत प्रसारित करणार…’

कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या आहेत. मुंढवा पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी हप्तेबाज असून, मुंढवा पोलीस ठाणे ते तीन कर्मचारी चालवतात. ते तीन पोलीस कर्मचारी पब, हॉटेलचालकांकडून पैसे घेतात. सविस्तर वाचा…

15:04 (IST) 24 May 2024

डोंबिवली एमआयडीसीला भंगार गोदामांचा विळखा; पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मुंबईच्या विविध भागातून, कुर्ला परिसरातून काही वर्षापूर्वी हटविलेले बहुतांशी बडे भंगार विक्रेते डोंबिवली, शिळफाटा, दहिसर-मोरी परिसरात येऊन स्थिरावले आहेत. २७ गाव हद्दीतील गोळवली, सोनारपाडा, पिसवली, व्दारली, उंबार्ली हा भंगार गोदामांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. सविस्तर वाचा…

14:50 (IST) 24 May 2024

वसई : प्रियकराचा बदला घेण्यासाठी लावला ‘हनी ट्रॅप’, अपहरण करून मागितली १ लाखांची खंडणी

वसई : मधुजाल (हनी ट्रॅप) लावून एका गुजराती व्यापार्‍याचे अपहरण आणि बलात्काराची धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार मिरारोड मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात ४ तरुणींसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे.

वाचा सविस्तर...

14:49 (IST) 24 May 2024

मुंबई : मेंदूमध्ये रक्तस्राव झालेल्या महिलेवर ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया

मुंबई : सतत डोकेदुखी व उलट्या होत असल्यामुळे त्रस्त असलेल्या महिलेवर मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तिचे प्राण वाचविले.

वाचा सविस्तर...

14:23 (IST) 24 May 2024

डोंबिवली एमआयडीसीतील जळीत अमुदान कंपनीच्या मालक, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

कामगारांचे मृत्यू, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत मानपाडा पोलिसांनी येथील सोनारपाडा येथील अमुदान केमिकल कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता, तसेच कंपनीचे संचालक, व्यवस्थापक आणि देखरेख पर्यवेक्षक अधिकारी यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा…

14:22 (IST) 24 May 2024

एकाग्रतेची वडिलांकडून शिकवण – सचिन तेंडुलकर

रमेश तेंडुलकर यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी मराठी संशोधन पत्रिकेच्या विशेषांकाचे सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 24 May 2024

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालानेच पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द !

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील २०१० नंतरची सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या निकालाचे आयोग स्वागत करतो, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. सविस्तर वाचा…

14:20 (IST) 24 May 2024

मराठीच्या प्राध्यापकाकडे इंग्रजी विभागाचा कार्यभार… कुठे घडला हा अजब प्रकार?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या प्रमुखाची जबाबदारी मराठीच्या प्राध्यापकाकडे देण्यात आल्याचे समोर आले आहे. विद्यापीठात शैक्षणिक विभागांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी असल्याचा फटका वेगवेगळ्या स्तरांवर बसत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. सविस्तर वाचा…

14:14 (IST) 24 May 2024

अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड: लैलाच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

परवेज हा लैलाच्या आईचा तिसरा पती होता. फेब्रुवारी २०११ मध्ये हे हत्याकांड उघडकीस आले होते.

सविस्तर वाचा...

13:57 (IST) 24 May 2024

पोर्श कार अपघात प्रकरणातील गाडी कोण चालवत होतं? पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती

पुण्यामध्ये शनिवारी रात्री आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या अपघातातील पोर्श ही कार कोण चालवत होतं? असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली असून गटनेतील अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं चौकशीत समोर आल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

13:09 (IST) 24 May 2024

राज्यातील सहा प्रकल्पांसाठी ६७ हजार कोटींच्या निविदा, निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय

तांत्रिक निविदा खुल्या केल्यानंतर मंगळवारी ‘एमएसआरडीसी’ने सहाही प्रकल्पांसाठीच्या निविदा खुल्या केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सविस्तर वाचा...

12:11 (IST) 24 May 2024

अंगठीवरून समजली अमुदान कंपनी स्फोटातील महिला कर्मचाऱ्याच्या मृतदेहाची ओळख

रिध्दी अमित खानविलकर (३८) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या तीन महिन्यांपूर्वी अमुदान केमिकल कंपनीत लेखा विभागात नोकरीला लागल्या होत्या.

सविस्तर वाचा...

11:56 (IST) 24 May 2024

सिंधुदुर्गमध्ये एक बोट उलटली, दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती

सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले बंदरात जाणारी एक बोट उलटल्याची घटना घटली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून काहीजण अद्याप बेपत्ता आहेत. या बोटमध्ये एकूण सातजण होते. बेपत्ता असणाऱ्यांची शोध मोहीम सुरू आहे.

11:56 (IST) 24 May 2024

नालासोपाऱ्यात कारखान्यात थिनर टँक स्फोट, कामगार जखमी

या लागलेल्या आगीत थिनर टँकचे काम करणारा कामगार होरपळून जखमी झाला आहे.

सविस्तर वाचा...

11:55 (IST) 24 May 2024

निवडणुकीमध्ये पैसे नाकारणारे मराठवाड्यातील गाव

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीदरम्यान पैशांचे आमिष तर असतेच असते. पण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी या गावाने पुढाऱ्यांना निक्षून सांगितले, ‘आमच्या गावात पैसे वाटू नका, दारू पुरवठा तर चालणारच नाही.’ आता कोणी गावात मतदानासाठी पैसे द्यायला येत नाही.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 24 May 2024

पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या

पुणे : येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वसतिगृहात तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

11:52 (IST) 24 May 2024

राज्याचा नवा शालेय अभ्यासक्रम खटकतोय ? ‘या’ मुदतीत नोंदवा आक्षेप…

वर्धा : महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या पायाभूत अभ्यासक्रम आराखड्यानुसार पायाभूत आराखडा तयार करीत तो प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राच्या गरजा, वैशिष्ट्ये व सद्यस्थिती विचारात घेऊन तिसरी ते बारावी इयत्तेपर्यंतचा अभ्यासक्रम असल्याचा दावा सरकारने केला आहे.

सविस्तर वाचा...

11:50 (IST) 24 May 2024

कोथरूडमध्ये दरोड्याचा प्रयत्न : नोकरांच्या प्रसंगावधानामुळे तीन दरोडेखोर ‘असे’ झाले जेरबंद

पुणे : मालक गावाला गेल्यानंतर बंगल्यातील नोकरांना धमकावून दरोडा टाकण्याच्या प्रयत्न नोकरांच्या प्रसंगावधानामुळे फसला. तिजोरी बाहेर ओढून नेत असताना दोन नोकरांनी चोरट्यांना बंगल्यात कोडून ठेवले.

सविस्तर वाचा...

11:45 (IST) 24 May 2024

बँकेच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून पोलिसांची सायबर फसवणूक

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली संदेश पाठवून एका पोलीस शिपायाची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा...

11:35 (IST) 24 May 2024

स्ट्राँग रुम भागात पुन्हा ठेकेदाराकडून खोदकाम, विद्युत वाहिनी तोडल्याने महावितरणकडून ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

या गंभीर प्रकारानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलर स्फोट दुर्घटनेस्थळी भेट दिली. यावेळी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. या कंपनीत कोणताही टेक्निकल तज्ञ नव्हता. रिअॅक्टर हॅडल करणं हे साध्या कामगाराचं काम नाही. हा स्फोट झाला याला पूर्णपणे या कंपनीचं व्यवस्थापन जबाबदार आहे. सरकार ही दुर्घटना घडण्याची वाट पाहत होतं का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (9)
Lok Sabha Election 2024 Updates : Maharashtra Breaking News Updates in Marathi| Weather Report Today| Petrol Diesel Price Today (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Maia Crooks Jr

Last Updated:

Views: 6116

Rating: 4.2 / 5 (43 voted)

Reviews: 82% of readers found this page helpful

Author information

Name: Maia Crooks Jr

Birthday: 1997-09-21

Address: 93119 Joseph Street, Peggyfurt, NC 11582

Phone: +2983088926881

Job: Principal Design Liaison

Hobby: Web surfing, Skiing, role-playing games, Sketching, Polo, Sewing, Genealogy

Introduction: My name is Maia Crooks Jr, I am a homely, joyous, shiny, successful, hilarious, thoughtful, joyous person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.